महिला कला निकेतन इथे नुकतेच महिला उद्योजिकांसाठी एक दिवसीय उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. नॅशनल इन्स्टिटयूट इंटरप्रेनरशिप अँड स्मॉल बिसनेस डेव्हलोपमेंट (NEISBUD),भारत सरकार आणि महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीस डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन द्वारे पुरस्कृत हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचे आयोजन महिला कला निकेतन आणि सई ट्रेनिंग सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना वाढ आणि गती मिळावी म्हणून (Raising and Accelerating MSME Productivity -RAMP )रॅम्प हा भारत सरकारच्या कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम अंतर्गत विविध जागी हा उपक्रम सुरू आहे.नागपूर शहरातील महिलांना व्यवसाय कर्ज, शासकीय योजना, उद्योग व्यवसाय जागरूकता, कर्जाविषयी लागणारी योग्य ती कागदपत्रे इत्यादी माहिती एका योग्य ठिकाणी देता यावी म्हणून या
नॅशनल इन्स्टिटयूट इंटरप्रेनरशिप अँड स्मॉल बिसनेस डेव्हलोपमेंटचे अधिकारी श्री. हरिमोहन गौतम, मुख्य प्रशिक्षक श्री. वैभव कुंभरे आणि श्रीमती सुरेखा ढोबळे या सर्वांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित 60 महिला उद्योजकांना या एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात व्यवसाय प्रशिक्षक श्री. वैभव कुंभरे यांनी व्यवसाय कसा निवडावा, प्रोडक्ट सिलेक्शन, मार्केट सिलेक्शन, व्यवसाय करताना लागणारी सर्व कागदपत्रे, डिमांड- सप्लाय नियम, व्यवसाय जागरूकता, मनी मॅनेजमेंट या बाबत योग्य ते प्रशिक्षण दिले.
दुसऱ्या सत्रात प्रशिक्षक श्रीमती सुरेखा ढोबळे यांनी उपस्थित सर्व महिलांचे भारतीय समाज, उद्योग व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेत भारतीय महिलांचे स्थान व लाभणारे योगदान याबाबत मोलाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात प्रशिक्षक श्री श्रीराम बांधे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी, यांनी शासकीय कर्ज योजना, सबसिडी योजना, व्यवसायाचे स्वरूप, कर्जासाठी लागणारे व्यवसाय प्रोजेक्ट रिपोर्ट कसे बनवायचे या महत्त्वाच्या बाबी सर्व महिला उद्योजकांसमोर योग्य प्रकारे सांगितल्या.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व प्रशिक्षक मंडळा सोबत सर्व महिला उद्योजकांचे प्रश्नोत्तराचे एक सत्र ठेवण्यात आले होते.
सर्व महिला उद्योजकांचा प्रशिक्षण कार्यशाळा प्रमाणपत्र देऊन सत्कारही करण्यात आला.
#RAMP #MahilaKalaNiketan #MSME









