




महिला कला निकेतन आणि प्रतिभा शक्ती (विदर्भ प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने कमी उष्मांक ( Low Calorie) पदार्थांच्या पाककला स्पर्धेचे यशस्वी आयोजन 21 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले .ईट राईट इंडिया कॅम्पेन अंतर्गत हे आयोजन करण्यात आले होते. चार गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला ज्यात एकूण १०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध शेफ विष्णुजी मनोहर यांनी यावेळी बोलताना सांगितले की अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्न सेवनाचा अतिरेक करू नये,जेवताना नीट सावकाश चावून खाल्ल्याने त्याचे समाधान मिळते,अंगी लागते.
या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून डॉ.रोहिणी काळीकर,डॉ.मनाली काणे,श्रीमती वर्षा तत्ववादी,श्रीमती विशाखा पवार आणि कु.सुजाता नागपुरे यांनी काम बघितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथी परिचय डॉ.संपदा नासेरी यांनी करून दिला.




